खाडी
Appearance
नदी जेथे समुद्राला जाऊन मिळते, तेथील पाण्याच्या साठ्याला खाडी असे म्हणतात. कधीकधी किनाऱ्याचा सखल भूभाग खचून किंवा समुद्राच्या पाण्याची पातळी वाढल्यानेसुद्धा समुद्री खाडी तयार होते. खाडी जर बऱ्यापैकी मोठी असेल तर तिला आखात म्हणतात.
बंगालचा उपसागर हा देखील एका अखाताचाच प्रकार आहे.
महाराष्ट्राच्या पश्चिम समुद्रकिनाऱ्याला अशा अनेक खाड्या आहेत. तिथली बहुतेक बंदरे खाडीच्या आश्रयाने बनली आहेत.
पहा : सामुद्रधुनी